Arun Yogiraj: अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज

Spread the love

कोण आहेत अरुण योगीराज (फोटो-ANI)

Who is Arun Yogiraj: मूर्तीकार अरुण योगीराज यांनी अयोध्येतील रामाच्या मंदिरात स्थापन होणारी मूर्ती साकारली आहे.

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान मोदी सोहळ्याचे मुख्य अतिथी असतील.

कोण आहेत अरुण योगीराज?

अरुण योगीराज कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध मूर्तीकार होऊन गेले. अरुण यांनी साकारलेल्या मूर्तींना विविध राज्यांमधून मागणी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रतिभेचं, कौशल्याचं कौतुक केलं आहे. अरुण यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम मूर्ती घडवल्या आहेत.

अरुण यांचे वडील योगीराजदेखील उत्तम मूर्तीकार आहेत. त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं. अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्ती घडवण्याची आवड आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत काम केलं. पण त्यांच्यातला मूर्तीकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे २००८ पासून मूर्तीकाम सुरू केलं.

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ३० फूट उंच मूर्ती आहे. ती अरुण योगीराज यांनी साकारली आहे. नेताजींच्या १२५ व्या जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींच्या योगदानावर भाष्य केलं आणि त्यांची एक मूर्ती इंडिया गेट परिसरात उभारण्याचा मानस बोलून दाखवला. मोदींची इच्छा अरुण यांनी पूर्ण केली. त्यांनी ३० फूट उंच मूर्ती घडवली. यासोबतच त्यांनी नेताजींची २ फूट उंच मूर्ती मोदींना दिली. त्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले होते

अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची १२ फूट उंच मूर्ती साकारली. म्हैसूरच्या चुंचनकुट्टेमध्ये हनुमानाची २१ फुटी मूर्ती घडवली. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १५ फूट उंच मूर्ती उभारली. म्हैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची सफेद अमृतशीला प्रतिमा, नंदीची ६ फूट उंच अखंड प्रतिमा, बनशंकरी देवीची ६ फूट उंच मूर्ती, म्हैसूरच्या राजाची १४.५ उंच पांढरी अमृतशिला यांच्यासह अनेक मूर्ती अरुण यांनी साकारल्या आहेत.

अरुण योगीराज यांची प्रगती पाहून आई सरस्वती यांनी आनंद व्यक्त केला. श्रीरामाची मूर्ती घडवताना मला त्याला पाहायचं होतं. पण मी तुला शेवटच्या दिवशी घेऊन जाईन, असं अरुण म्हणाला. आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मी अयोध्येला जाईन. तेव्हाच मूर्ती पाहीन. अरुण गेल्या ६ महिन्यांपासून अयोध्येतच आहे. त्याचं हे यश पाहायला आज त्याचे वडील हवे होते, अशा हृद्य भावना त्यांनी बोलून दाखवल्या.


Spread the love

One thought on “Arun Yogiraj: अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *