100th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan

Spread the love

100th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास चिंचवड येथे प्रारंभ झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्यनाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या संमेलनाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
वामन पंडित संपादित ‘रंगवाचा’ या नियतकालिकाचे आणि १०० व्या मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नांदीhttps://vishwakosh.marathi.gov.in/19459/‘ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन ‘रंग निरंतर’ चेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

100th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan
100th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan

नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न

मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत, मात्र हे करताना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल.

नाट्यसंमेलन कसं असेल? (Natya Sammelan Schedule)

5 जानेवारी 2024 – पुण्यातलं शतक महोत्सवी नाट्य संमेलन सुरू होतंय, अनुभवस्वरूप एक साहित्यिक सजीव पर्व!

6 जानेवारी 2024 – पिंपरी-चिंचवडमध्ये होणारं नाट्य संमेलनाचं उद्घाटन, सोहळंबरोबर झळलेलं एक सांगीतिक उत्सव!

7 जानेवारी 2024 – विविध कार्यक्रमांचं आयोजन, महाराष्ट्रातलं विविध शाखा आणि कलावंतांचं सहभाग. सर्वांचं आनंद घेतलं पाहिजे! 🎭🎶🌟


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *